कुठवर?

दिसम्बर 22, 2006 at 1:50 अपराह्न (सध्या)

सगळं किती मस्त वाटते नाही?  परीसोबत असायचं,फक्त तिच्यासोबत असायचं बस्स!
आता लपवण्यासारखंतसं काही राहिलं नाही.एक दिवस हिम्मत करून माझ्या सर्व डायऱ्या तिच्या हाती ठेवून दिल्या होत्या.तिनं कादंबरी सारख्या वाचल्या अन् ‘नाही’ न म्हणता निघून गेली.
मग आणखी जवळ यायला लागलो. कधी कधी खूप भिती वाटते हे सर्व शेवटाला नेण्याइतकी शक्ती आहे का आपल्यात? आंतरजातीय प्रेमविवाह वगैरे..!
मग कधी वाटतं
वो अफ़साना जिसे तक़मील तक लाना हो नामुमकीन
उसे एक ख़ूबसूरत मोड देकर छोडना अच्छा…

अन् तरीही परीचा जेव्हा विचार करतो तेव्हा, I know she loves me too much. At least,more than that I do!  हे सगळं खूप कठीण होऊन बसलंय. याला शेवटापर्यंत न्यायचंय.मला माहित आहे  she is best suited to me in the in world.

कधी म्हणते,”इतके दिवस झाले तुमच्यासोबत आहे.तुम्हाला इतकं तर ओळखतेच नं?”  मला काय हवं काय नको; प्रत्येक गोष्ट माझ्याइतकिच तिलाही समजते. कधीकधी मी एखाद्या गोष्टीसाठी अडतो,मला कळतही नाही मी कशासाठी अडलो तर ती म्हणते- ९ डिसेंबर! मग माझ्या लक्षात येतं, मी हातात पेन घेऊन कधीपासून तारखेचा विचार करतोय.

आणि कधी म्हणते, “नंतर त्रास झाल्यापेक्षा आता झालेला बरा! ” अगदी मनापासून म्हणते. कारण तिलाही भविष्य वाचता येतं. तरीही तो नंतरचा त्रास आजवर ओढवून घेऊ शकत नाही.

ती असं काही बोलते अन् मग मी अगदी गप्प होऊन जातो. मग म्हणते,
“एक गोष्ट सांगू? तुम्ही असे नाराज़ नाराज़ चांगले नाही वाटत.”
“मग कसा चांगला वाटतो?”
या प्रश्नाचं उत्तर शब्दात कधीच नसतं तिच्याकडे अन् कधी आवश्यकताही वाटत नाही त्याची!

माझ्या सगळ्या असण्याला व्यापून असणारी परी! एखाद्या दिवशी माझ्या हातात हात देऊन घरी येईल अन् “वहिनी,नाव घ्या” म्हणत घराच्या दारात मुसळ लाऊन अडवायलाही कुणीच असणार नाही. कदाचित आम्ही येऊ, घराचं कुलुपही आम्हालाच उघडावं लागेल.

मी असं काही बोललो तर ती म्हणते, “किती विचार करता नं तुम्ही?”  मग पुन्हा तीच म्हणते, “पण विचार करणं थांबवताही येत नाही नं!”

अशी माझी परी! येडी, मॅड पऱी! अन् मीही काही कमी नाही…. जन्मजात मुर्ख! बस्स!

1 टिप्पणी

  1. DnyanVandana said,

    Sahi hai re Bhau…!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.